वाढदिवसापेक्षा सद्‌गुणांचा संकल्प करा : आचार्य हेमसागरजी महाराज

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पाश्चात्त्य पद्धतीने मेणबत्ती विझवून आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपल्या जीवनातील एखादी वाईट प्रवृत्ती सोडण्याचा संकल्प करा. साधू-संतांच्या जन्मजयंती अथवा अवतरण दिनी असा संकल्प केल्यास त्या दिवसाचा खरा उद्देश साध्य होईल, असे प्रतिपादन सिद्धांत चक्रवर्ती प.पू. आचार्य श्री १०८ हेमसागरजी महाराज यांनी केले.
आर्यनंदी कॉलनी, वेदांतनगर परिसरातील श्री १००८ चंद्रप्रभु खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात आचार्य श्री हेमसागरजी महाराज यांच्या ६९ व्या अवतरण दिनानिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध धार्मिक विधी, भजन, नाटिका तसेच विनयांजली कार्यक्रम झाले.
अवतरण दिवस
31
अनन्या पहाडे व आशिका जैन यांनी मंगलाचरण केले. शैलेश पहाडे व वैशाली पहाडे यांनी सादर केलेल्या धार्मिक भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आचार्य पादप्रक्षालनाचे सौभाग्य विशाल चांदमल पाटणी यांना लाभले. पिच्छीचे सौभाग्य महेंद्र पप्पू ठोले, कसाबखेडा, कमंडलूचे नितीन चुडीवाल, शास्त्रभेटीचे सुंनदा रितेश पाटणी, तर आरतीचे सौभाग्य सर्वेश लोहाडे, खेतली यांना मिळाले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions